मॅक्सवेलचं या भारतीय तरुणीवर जडलं प्रेम, लग्नाची पत्रिका जगभरात व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे हृदय एका भारतीय तरुणीवर आले आहे. आता हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
मुंबई : आयपीएल 2022 मेगा लिलावानंतर, चाहते इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लीगपूर्वीच लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी येत आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय मुलीशी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण कोण आहे विनी रमण आणि दोघांची भेट कशी झाली, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे हृदय एका भारतीय तरुणीवर आले आहे. मॅक्सवेलने 21 फेब्रुवारी 2020 रोजी भारतीय वंशाच्या विनी रमनशी एंगेजमेंट केले आणि आता हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
ग्लेन मॅक्सवेल 27 मार्च रोजी मेलबर्नमध्ये आपली भारतीय वंशाची मंगेतर विनी रमनसोबत लग्नासाठी तयार आहे. त्यामुळे तो आगामी पाकिस्तान ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार आहे.
मॅक्सी आणि विनीच्या लग्नात फक्त 350 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक आहेत. त्यांच्या लग्नाचे कार्ड आता जगभरात व्हायरल झाले आहे.
खरं तर, विनीच्या भारतातल्या काही नातेवाईकांनी उत्साहात त्यांच्या काही मित्रांना हे आमंत्रण दाखवलं आणि ते इंटरनेटवर व्हायरल झालं. यानंतर मॅक्सवेल म्हणाले की, आता मेलबर्नमध्ये होणाऱ्या लग्नासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करावी लागेल.
ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन लग्न करणार आहेत, त्यांचे तामिळ लग्नाचे कार्ड व्हायरल झाले आहेत. विनी ही मूळची भारताची आहे. मात्र, तिचा जन्म ऑस्ट्रेलियातच झाला होता. तिचे आई-वडील दक्षिण भारतातील आहेत.
28 वर्षीय विनी मेलबर्नमध्ये राहते. तिने मेंटन गर्ल्स सेकंडरी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते फार्मासिस्ट म्हणून काम करू लागले. तिला प्रवास आणि पोहायला आवडते. तिला अनेक वेळा स्नूकर आणि गोल्फ खेळतानाही पाहिले गेले आहे.