गॉल : गॉल टेस्टवर टीम इंडियानं आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारतानं 3 विकेट्स गमावून 189 रन्सपर्यंत मजल मारलीय. कॅप्टन कोहली 76 रन्सवर नॉटआऊट आहे. तर अभिनव मुकुंदनं  81 रन्सची शानदार इनिंग खेळली. भारताकडे आता 498 रन्सची भक्कम आघाडी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली आणि अभिनव मुकुंदनं तिस-या विकेटसाठी 133 रन्सची पार्टनरशिप केली. ही पार्टनरशिप भारताच्या इनिंगमध्ये महत्त्पूर्ण ठरली. तत्पूर्वी, टीम इंडियानं लंकन टीमला पहिल्या इनिंगमध्ये 291 रन्सवर गुंडाळण्यात यश आलं. 


रवींद्र जाडेजानं भारताकडून सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. आता टेस्टच्या चौथ्या दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींना विराट कोहलीच्या सेंच्युरीची अपेक्षा असणार आहे.