Winter Olympics Day 2018: गूगलच्या डूडलमध्ये वेगाने धावणारे कासव
आजचे गूगल डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते.
मुंबई : दक्षिण कोरियाच्या प्योंगचांग येथे यंदाच्या विंटर ऑलिम्पीकला शानदार सुरूवात झाली. अवघ्या क्रीडा विश्वाचा हा उत्सव जगभरातील क्रीडाप्रेमी आपापल्या पद्धतीने साजरा करत आहेत. इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलही यात सहभागी असून, गूगलने डूडल बनवून हा आनंद साजरा केला आहे. हा आनंद साजरा करताना डूडलमध्ये झळकणारे गूगलचे धावणारे कासव लक्ष्यवेधी ठरत आहे.
गूगल डूडल GIF
गेले दोन दिवस Winter Olympics Day 2018 दरम्यान, गूगल चांगलेच फॉर्मात आहे. कालच (शुक्रवार, ९ फेब्रुवारी) गूगलने झाडावर बसवलेली चिमणी दाखवली होती. त्यानंतर आजही (शनिवार, १० फेब्रुवारी) गूगलने शानदार डूडल बनवले आहे. लक्ष्यवेधी असे की, आजचे गूगल डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते. आपण डूडलवर क्लिक करताच व्हिडिओ सुरू होतो. ज्यात आपण खेळाच्या मैदानावर वेगाने धावणारे कासव दिसते. मंद गतीने चालण्यासाठी कासव प्रसिद्ध आहे. पण, डूडलमधले कासव अत्यंत वेगाने धावताना दिसत आहे. धावणारे कासव काही वेळात तोंड उघडते आणि जागेवर जाऊन बसते.
दोन कासवे, तीही रंगीत
डूडलमध्ये दिसणारे कासव एकटेच नाही. या कासवासोबत आणखी एक कासव आहे. म्हणजेच आपल्याला दोन कासवे, तीही रंगीत दिसतात. ज्यात एक पांढरा आणि दुसरा हिरव्या रंगाचा आहे. कासवांच्या पाठीवर पडणारी सूर्याची किरणे एक वेगळीच चमक दाखवतात. या किरणांसोबत ऑलिम्पीकचा सिंबॉलही पहायला मिळत आहे. महत्त्वाचे असे जो पर्यंत Winter Olympics Day 2018 चा उत्सव सुरू राहील तोपर्यंत गूगलकडून डूडलची मौज आपल्याला आनंद देत राहणार आहे.