हैदराबाद : सायना नेहवाल, पी.व्ही सिंधू या बॅटमिंटनपटूंना घडवणार्‍या गोपीचंदच्या घरीदेखील आता आनंदाचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री  हिने अंडर १९ ची राष्ट्रीय चॅम्पियनशीप जिंकली आहे. 


पुलेला यांच्या घरी आनंदाला उधाण 


गायत्रीच्या आईने वयाच्या १६ व्या वर्षी  राष्ट्रीय चॅम्पियनशीप जिंकली होती. मात्र त्यांचा रेकॉर्ड मुलीने  मोडीत काढत वयाच्या १४ व्या वर्षी  अंडर १९ ची राष्ट्रीय चॅम्पियनशीप जिंकली आहे.  यापूर्वी गायत्रीने ज्युनियर विश्व बॅटमिंटन किताब पटकवला आहे. 


पुलेला गोपिचंद  हे राष्ट्रीय कोच आहे. त्यांनी सायना नेहवाल, पि.व्ही सिंधू यांसारख्या अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सहाजिकच गायत्रीवर अपेक्षाचं ओझं होतं. पण यासार्‍यावर मात करत गायत्रीने विजय पटकवला आहे. 


कसा रंगला खेळ 


पंजाब युनिव्हर्सिटीच्या कोर्टमध्ये हा खेळ रंगला होता. या  खेळात गायत्रीने तिची सीनियर शटलर पूर्वा भावेवर  23-21, 21-18 ने मात केली.  
  
गायत्रीचा लहान  भाऊ साई विष्णूदेखील शटलर आहे. अनेक डबल्स स्पर्धांमध्ये   त्याने विजय मिळवला आहे. गोपिचंद फॅमिली बॅटमिंटन खेळामध्येच आहेत.