नवी दिल्ली : टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया असा सामना रंगण्यापूर्वीच शाब्दिकयुद्ध सुरु झालं आहे.


विजयाचा दावा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकजण आपला विजय होणार असल्याचा दावा करत आहे. दोन्ही टीम्स आपली बाजू मजबूत असल्याचं म्हणत आहेत. मात्र, असे असले तरी येत्या काळात कोण जिंकणार आणि कोण हरणार हे स्पष्ट होणार आहे.


टीम इंडियाला आव्हान


श्रीलंकन टीमविरोधात वन-डे मॅचेस आणि टी-२० सीरिज संपल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन ग्रीम स्मिथ याने विराट कोहली आणि टीम इंडियाला आव्हान दिलं आहे. 


टीमची खरी परीक्षा 


ग्रीम स्मिथने म्हटलं की, टीम इंडियासाठी खरं आव्हान दक्षिण आफ्रिकेत आहे. टीम इंडिया ज्यावेळी घरातून बाहेर पडेल आणि परदेशात खेळण्यास येईल त्यावेळी त्यांची खरी परीक्षा असणार आहे.


कौशल्य आणि कामगिरी दाखविण्यासाठी चांगली संधी


आमच्या बॉलर्सचीही खरी परीक्षा टीम इंडियासमोर असणार आहे. आमच्या बॉलर्सला आपलं कौशल्य आणि कामगिरी दाखविण्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे असंही स्मिथने म्हटलं आहे. 


टीम इंडियाच्या विजयाची कामगिरी ही परदेशात खराब आहे त्याच्या आधारावर स्मिथने हा दावा केला आहे. तसेच टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत विजय मिळवायचा असेल तर बॉलर्सला चांगली कामगिरी करावी लागेल असं वक्तव्यही स्मिथने केलं आहे.