मुंबई : गुजरात टीमने आयपीएलमध्ये 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. चेन्नईने 4 सामने गमवले असून एक सामना जिंकला आहे. चेन्नई सलग दुसऱ्या विजयासाठी काय नवा प्लॅन आखणार पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईनं गेल्या सामन्यात पहिला विजय मिळवला होतं. उथप्पा आणि शिवम दुबेच्या दमदार फलंदाजीचा चेन्नईला फायदा झाला होता. ऋतुराजच्या फॉर्मवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. चेन्नई आपल्या टीममध्ये काय बदल करणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


पॉईंट टेबलमध्ये गुजरात टीम पहिल्या स्थानावर आहे. गुजरात आपलं स्थान कायम राखण्यासाठी टीममध्ये गुरबाजला संधी देण्याची शक्यता आहे. गुजरबाजला टीममध्ये एन्ट्री दिल्यानंतर कोणाला बाहेर जावं लागणार पाहावं लागेल. 


चेन्नई संभाव्य प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), गुरबाज, शुभमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी, यश दयाल 


गुजरात संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रविंद्र जडेजा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), रोबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू,  ड्वेन ब्रावो, महिस थीक्षना, क्रिस जोर्डन, मुकेश चौधरी