IPL 2023: आयपीएलला (IPL 2023) आजपासून सुरुवात झाली. पहिला सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. दरम्यान या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा विजय झाला आहे. गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरात टायटन्सने विजयी श्री'गणेशा केला आहे. (Gujarat Titans beat Chennai Super Kings)


उत्कंठा वाढणारा सामना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्सला शेवटच्या 3 ओव्हरमध्ये 30 रन्स जिंकण्यासाठी हवे होते. या परिस्थितीत सामना रोमांचक वळणावर आलेला. राहुल तेवतिया आणि रशिद खान यांनी उत्तम खेळी करत चेन्नईचा विजयाचा डाव हिरावून घेतला. तेवतियाने नाबाद 15 रन्सची खेळी केली. तर राशिदने 10 रन्स केले. शुभमन गिलने सर्वाधिक ६३, विजय शंकर 27 आणि ऋद्धिमान साहाने 25 रन्सचं योगदान दिलं


शुभमन गिलचं अर्धशतक 


आजच्या सामन्या शुभमन गिलने तुफान खेळी केली. गिलने 12व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. मात्र 15 व्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेने त्याची विकेट घेतली. गिलने 36 बॉल्समध्ये 63 रन्स केले. त्याच्या या खेळीमध्ये त्याने 6 फोर आणि तीन सिक्स लगावले.


गुजरातसमोर 179 रन्सचं लक्ष्य 


पहिल्याच सामन्यात गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी  चेन्नई सुपर किंग्जने फलंदाजी करत गुजरात टायटन्ससमोर 179 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. फलंदाजीमध्ये ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक म्हणजेच 92 रन्स केले. त्याच्याशिवाय मोईन अलीने 23 रन्सची खेळी केली. 


चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने शेवटच्या ओव्हरमध्ये एक सिक्स आणि एक फोर लगावत टीमचा स्कोर 178 पर्यंत नेला. तोपर्यंत चेन्नईचे 7 विकेट्स गेले होते. दुसरीकडे गुजरातकडून राशिद खान, अलझारी जोसेफ आणि मोहम्मद शमीने यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतले.


केन विलियम्सन फील्डिंग दुखापतग्रस्त


चेन्नई फलंदाजी करत असताना 13 व्या ओव्हरमध्ये जोशुआ लिटल गोलंदाजी करत होता. यावेळी ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर गायकवाडने मोठा शॉट खेळला. बाऊंड्री लाईनजवळ उभ्या असलेल्या केनने बॉल पकडला मात्र बाऊंड्री लाईनच्या बाहेर पडत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने बॉल फेकला. यावेळी त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला जबर दुखापत झाली. यावेळी तातडीने तपासणी करण्यासाठी फिजिओला बोलावण्यात आलं. यावेळी केन वेदनेने कळवळत होता.