मुंबई : गुजरात लेग स्पिनर राशीदने मंगळवारी लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात 4 विकेट्स घेऊन अनोखा रेकॉर्ड रचला आहे. रशिदने विरोधी टीमला 82 धावांवर रोखलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिद खानच्या घातक गोलंदाजीमुळे गुजरात टायटन्सने लखनऊवर 62 धावांनी विजय मिळवला आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं. अफगाणिस्तानच्या 23 वर्षीय लेग स्पिनर राशिद खानने धमाकेदार कामगिरी केली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. 


राशिदचं जगभरात कौतुक होत आहे. टी 20 मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा राशिद खान जगातला तिसरा खेळाडू बनला आहे. लखनऊ विरुद्ध सामन्यात त्याने 3.5 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. टी 20 क्रिकेटमध्ये त्याने 450 विकेट्स घेतल्या आहेत. असा विक्रम करणाऱ्या तो तिसरा खेळाडू ठरला आहे. 


टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. त्याने 587 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर इमरान ताहिर आहे. त्याने 451 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानावर राशिद खान आहे. ज्याने 450 विकेट्स घेतल्या आहेत. 


राशिदच्या या कामगिरीचं खूप कौतुक होत आहे. टी 20 मध्ये जास्त विकेट घेणाऱ्यांच्या लीस्टमध्ये कोणकोण जाणून घेऊया. 
1.  ड्वेन ब्रावो (वेस्टइंडीज) - 587 विकेट
2.  इमरान ताहिर (दक्षिण आफ्रिका) - 451 विकेट
3.  राशिद खान (अफगानिस्तान) - 450 विकेट
4.  सुनील नरेन (वेस्टइंडीज) - 437 विकेट