मुंबई : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची (Gujrat Election 2022) जोरात तयारी सुरु आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja Wife) पत्नी रिवाबा जाडेजाही (Rivaba Jadeja) निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. जाडेजा दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र अनफीट जाडेजा रिवाबाच्या प्रचारासाठी प्रचारसभेत सहभागी होतोय. आपल्या पत्नीला आपण सेलिब्रिटी असल्याचा फायदा व्हावा यासाठी जाडेजा प्रत्येक प्रचारसभेत जाडेजा दिसतोय. यावरुनच नेटकऱ्यांनी जाडेजाला धारेवर धरलंय. वर्ल्ड कपआधी अनफीट असलेला जाडेजा हा पत्नीच्या प्रचारासाठी फिट कसा काय? असा संतप्त सवाल नेटकऱ्यांन उपस्थित केला आहे. (gujrat election 2022 team india ravindra jadeja troll on social media after his wife rivaba jadeja campaign)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमध्ये एकूण 2 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहे.  त्यानुसार पहिल्या टप्प्यातील  मतदान 5 आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 8 डिसेंबरला होणार आहे. रिवाबाला भाजपने जामनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 8 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याआधी जाडेजा आपल्या पत्नी रिवाबाचा जोरदार प्रचार करतोय.  


जाडेजाला काही महिन्यांआधी गुडघ्याची दुखापत झाली. यामुळे त्याला टी 20 वर्ल्ड कपला मुकावं लागलं होतं. तसेच सध्या न्यूझीलंड दौऱ्यातही त्याची निवड करण्यात आलेली नाही. दरम्यानच्या काळात जाडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो मैदानात उतरलेला नाही. मात्र पत्नीच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या 'मैदानात' उतरल्याने जाडेजाला धारेवर धरलंय. 


जाडेजाच्या दुखापतीमुळे त्याला आगामी बांगलादेश दौऱ्यातील वनडे सीरिजमधूनही माघार घ्यावी लागलीय. अशात जाडेजाची दुखापत ही सोयीनुसार आहे का, असा सवालही नेटकऱ्यांनकडून विचारला जात आहे.