चेन्नई : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाच्या संघात बदल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आरोन फिंचला दुखापत झाल्याने तो सामन्यात खेळू शकणार नाहीये. त्यामुळे त्याच्या जागी संघात पीटर हँड्सकॉम्बला संधी देण्यात आलीये.


cricket.com.auच्या रिपोर्टनुसार, रविवारी होत असलेल्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर हँड्सकॉम्ब चेन्नईसाठी रवाना होणार आहे. गुरुवारी सराव सुरु असताना फिंचच्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे तो वनडेत खेळू शकणार नाहीये.


दरम्यान, भारताच्या संघातही एक बदल झालाय. भारताचा सलामीवीर शिखर धवन आपल्या आजारी बायकोला भेटण्यासाठी गेल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत खेळू शकणार नाहीये.