मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारीची निवड झाली आहे. टीममध्ये पृथ्वी शॉची निवड निश्चित मानली जात असली तरी दुसऱ्या स्थानासाठी हनुमा विहारी आणि मयंक अग्रवाल यांच्यामध्ये स्पर्धा होती. पृथ्वी आणि मयंकनं मागच्या २ महिन्यांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त रन केले आहेत. तर हनुमा विहारीनं याच कालावधीमध्ये ६०० रन केले आहेत.


प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकही टेस्ट न खेळणारा हनुमा विहारी सर डॉन ब्रॅडमन यांच्या रेकॉर्डच्या यादीमध्ये आहे. ब्रॅडमन यांनी २३४ मॅचमध्ये ९५.१४ च्या सरासरीनं २८,०६७ रन केले आहेत. टेस्ट क्रिकेटप्रमाणेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही ब्रॅडमन यांची सरासरी सर्वाधिक आहे. हनुमा विहारी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असणाऱ्या टॉप १० बॅट्समनमध्ये आहे. असं रेकॉर्ड असणारा सध्याच्या क्रिकेटपटूंमधला हनुमा विहारी हा एकमेव बॅट्समन टॉप १० मध्ये आहे. हनुमा विहारीनं ६३ मॅचमध्ये ५९.७९ च्या सरासरीनं ५,१४२ रन केले आहेत. यामध्ये १५ शतकांचा समावेश आहे.


सचिन १४व्या विराट ४४ व्या क्रमांकावर


या यादीमध्ये सचिन तेंडुलकर १४ व्या तर विराट कोहली ४४व्या क्रमांकावर आहे. विराटनं १०० मॅचमध्ये ५३.९७ च्या सरासरीनं ८,०४३ रन केले आहेत.


टॉप ५० मध्ये भारताचे २० क्रिकेटपटू


प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असणाऱ्या टॉप ५० खेळाडूंमध्ये भारताचे २० खेळाडू आहेत. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर विजय मर्चंट या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मर्चंट यांनी १५० मॅचमध्ये ७१.६४ च्या सरासरीनं १३,४७० रन केले होते. चौथ्या क्रमांकावर अजय शर्मा यांनी ६७.४६ च्या सरासरीनं रन केले. या यादीमध्ये विनोद कांबळी १०व्या, विजय हजारे ११व्या, सुरेंद्र भावे १३व्या आणि सबा करीम २०व्या क्रमांकावर आहेत. राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे खेळाडूही टॉप ५० मध्ये आहेत.