Harbhajan Singh apologized for Tauba Tauba Dance : वर्ल्ड चॅम्पियन्स लीगची ट्रॉफी (WCL 2024 Final) जिंकल्यानंतर इंडिया चॅम्पियन्सने जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यावेळी कॅप्टन युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरैश रैना आणि गुरकीरत मान यांनी तौबा तौबा गाण्यावर (Tauba Tauba Dance) डान्स केला. या चॅम्पियन खेळाडूंचा डान्स तुफान व्हायरल झाला. मात्र, या खेळाडूंची चंपाईत झाली होती. नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपलचे (NCPEDP) कार्यकारी संचालक अरमान अली यांनी अमर कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तर पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने देखील यावर आक्षेप नोंदवला होता. त्यावर आता हरभजन सिंगने (Harbhajan Singh apologized) जाहीर माफी मागितली आहे.


काय म्हणाला Harbhajan Singh? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्यापैकी जे इंग्लंडमध्ये चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर सोशल मीडियावर आमच्या अलीकडील तौबा तौबा व्हिडिओबद्दल तक्रार करत आहेत त्यांना मी फक्त स्पष्ट करू इच्छितो की, आम्हाला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या, असं हरभजन सिंगने म्हटलं आहे.


आम्ही प्रत्येक व्यक्ती आणि समुदायाचा आदर करतो. आणि हा व्हिडीओ केवळ 15 दिवस सतत क्रिकेट खेळल्यानंतर आमची शरीरयष्टी दाखवण्यासाठी होता, आम्ही थकलो होतो, असं हरभजनने म्हटलं आहे. 


आम्ही कोणाचा अपमान किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. तरीही आपण काही चुकीचं केलं असं लोकांना वाटत असेल तर मी माझ्या बाजूनं एवढंच सांगू शकतो. आम्हा सर्वांना माफ करा... कृपया हे इथंच थांबवा आणि पुढे जा. आनंदी आणि निरोगी रहा, असं हरभजन सिंगने पोस्टमध्ये म्हटलं आहे.



दरम्यान, हरभजन सिंगने त्याच्या इन्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओ देखील डिलीट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिग्गज खेळाडू युवराज, हरभजन आणि सुरेश रैना यांच्यासोबत गुरकीरत सिंग तौबा तौबा या नव्या गाण्यावर मस्ती करताना दिसले होते.