`संन्यास` सोडून मैदानावर ये : हरभजन सिंह
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाची कामगिरी तुलनेत अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीची मजेदार फिरकी घेत भारतीय गोलंदाच हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुनरागमन करण्याचा सल्ला दिला.
नवी दिल्ली : एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाची कामगिरी तुलनेत अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीची मजेदार फिरकी घेत भारतीय गोलंदाज हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुनरागमन करण्याचा सल्ला दिला.
हरभजनने ट्विटरच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाच्या संघावर गुगली टाकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील वेगवान आणि फलंदाजांना जखडून ठेवणाऱ्या गोलंदाजांचे युग आता संपले आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळत असलेली टीम पाच सामन्यांची मालिका आगोदरच गमावून बसली आहे. हा संघ अद्यापही ३-०ने मागे चालला आहे. केवळ गुणवत्तेमुळे ऑस्ट्रेलियाने ही मालिका गमावल्याचे हरभजनने म्हटले आहे.
सोमवारी (२५ सप्टेंबर) केलेल्या ट्विटरमध्ये हरभजन सिंहने म्हटले आहे, 'दोस्त (क्लार्क)' आता आपण आपला क्रिकेट संन्यास सोडून मैदानावर येण्याची गरज आहे. मला वाटते की, भेदक गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे युग आता संपले आहे. आता त्या संघात मला कोणताही गुणवत्ता दिसत नाही.'
दरम्यान, हरभजनच्या ट्विटला मायकेल क्लार्कनेही तसेच उत्तर दिले आहे. ट्विटरच्या माध्यमातून क्लार्क म्हणतो, ऑस्ट्रेलियन संघाला जर भारताच्या 'विराट' टीमला टक्कर द्यायची असेल तर, कठोर मेहनत करावी लागेल. मी आताच हरभजनचे ट्विट पाहिले. पण, माझ्या जून्या पायांना आता वातानुकूलीत कॉमेंट्री बॉक्समध्येच रहायला छान वाटते. ऑस्ट्रेलिया संघाने चांगल्या खेळासाठी बरेच काही करण्याचे गरजेचे आहे, असेही क्लार्कने म्हटले आहे.