नवी दिल्ली : टीम इंडियातून सध्या बाहेर असलेला स्पिनर हरभजन सिंहने दक्षिण आफ्रिका दौ-यात वेगवान गोलंदाजांपासून सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच रविचंद्रन अश्विनची जागा टीममध्ये निश्चित व्हायला पाहिजे, असेही तो म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरभजन सिंह म्हणाला की, ‘दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन भारता विरूद्धा आगामी टेस्ट सीरिजमध्ये जास्त महागात पडणार नाही. स्टेन गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टेस्ट सामन्यादरम्यान खांड्याच्या त्रासामुळे क्रिकेटपासून दूर होता. डेल स्टेन गेल्या वर्षातील सर्वात चांगला वेगवान गोलंदाज आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापसी करणं सोपं नसतं’.   


टीम इंडियाची टफ बॅटींग लाईन


तो म्हणाला की, ‘टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमाकडे पाहिल तर मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा सारखे दिग्गज आहेत. हा जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाजीचा क्रम आहे. यांना मात देणे स्टेन आणि मोर्कलसाठी सोपं नसणार आहे. 


सहाव्या क्रमांकावर रोहित शर्माला पाठवावे


हरभजन म्हणाला की, ‘रोहित शानदार खेळाडू आहे. तो पूल आणि कट शॉट चांगला खेळतो. माझ्या नजरेत तो सहाव्या क्रमांकासाठी उपयुक्त आहे. हार्दिक पांड्या प्रभावशाली खेळाडू आहे आणि रोहित बरोशाचा खेळाडू.