गोलंदाजाकडून भज्जीची नक्कल, VIDEO पाहून हरभजनचं डोकं चक्रावलं
KKR संघानं हरभजन सिंगवर 2 कोटींची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं. IPLमधील सर्वात जुना आणि अनुभवी खेळाडू म्हणून 40 वर्षीय हरभजन सिंगकडे पाहिलं जात आहे.
मुंबई: भारतीय स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग अनेक यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहेत. त्यांच्या गोलंदाजीची आणि ते जी गोलंदाजी करताना ऍक्शन करतात त्याची खूप जास्त चर्चा होत असते. त्याच्या हटके स्टाईल गोलंदाजीसाठी त्यांना जगभरात ओळखलं जातं. आता त्यांच्याच स्टाईलची कॉपी एका गोलंदाजानं केली आहे. हा व्हिडीओ चक्क हरभजन सिंगनं आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.
हरभजन सिंगने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता की गोलंदाज वेगानं हात फिरवत गोलंदाजी करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर डोकं चक्रावल्याचं भज्जीनं कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे. माझ्यापेक्षा बरी कॉपी असं म्हणत त्याने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. बॉल स्पिन होईल की नाही माहीत नाही पण हे पाहून डोक मात्र नक्की चक्रावलं असल्याचं भज्जीनं कॅप्शन लिहिलं आहे.
IPL 2021: 5 दिग्गज खेळाडू मिळून उडवणार IPLमध्ये 'धुरळा'
2020मध्ये हरभजन सिंग IPL खेळू शकले नव्हते. मात्र आता चेन्नई सुपरकिंग्स संघानं त्यांना रिलीज केल्यानंतर IPL ऑक्शनमध्ये 2 कोटींची बोली त्यांच्यावर लावण्यात आली होती. हरभजन सिंहला यंदा CSK संघानं IPLच्या लिलावादरम्यान रिलीज केलं. त्यानंतर KKR संघानं त्याला 2 कोटींची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं. IPLमधील सर्वात जुना आणि अनुभवी खेळाडू म्हणून 40 वर्षीय हरभजन सिंगकडे पाहिलं जात आहे.