IPL 2021: 5 दिग्गज खेळाडू मिळून उडवणार IPLमध्ये 'धुरळा'

   

Mar 10, 2021, 10:26 AM IST

IPLच्या 14 व्या हंगामची सर्वांनाच उत्सुकता आहे. 9 एप्रिलपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. 30 एप्रिल रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. IPLमध्ये दरवर्षी नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली जाते. तर जुन्या-नव्या खेळाडूंची टीम तयार होऊन ह्या सामन्याची मैदानातील रंगत दरवर्षी वाढत असते. यावर्षी मात्र 5 दिग्गज खेळाडू IPLच्या मैदानात होणाऱ्या सामन्यात धुरळा उडवणार आहेत. 

1/5

इमरान ताहीर

इमरान ताहीर

दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज स्पिनर इमरान ताहीर IPLमध्ये आपल्या स्फोटक गोलंदाजीनं दांड्या गुल करण्यासाठी सज्ज आहे. 41 वर्षीय ताहीर IPLमधील सर्वात जास्त वय असलेला खेळाडू आहे. 2019 च्या आयपीएलमध्ये ताहीरने जांभळा कॅपही जिंकली होती. 

2/5

केदार जाधव

केदार जाधव

यावर्षी36 वर्षीय केदार जाधवला सीएसके टीमने रिलीज केलं. केदारला सनरायझर्स हैदराबादच्या टीमनं लिलावत बोली लावून घेतलं आहे. केदार हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जुन्या खेळाडूंपैकी एक आहे. 

3/5

हरभजन सिंह

हरभजन सिंह

हरभजन सिंहला यंदा CSK संघानं IPLच्या लिलावादरम्यान रिलीज केलं. त्यानंतर KKR संघानं त्याला 2 कोटींची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतलं. IPLमधील सर्वात जुना आणि अनुभवी खेळाडू म्हणून 40 वर्षीय हरभजन सिंहकडे पाहिलं जात आहे. 

4/5

ख्रिस गेल

ख्रिस गेल

टी -20 क्रिकेटचा महान फलंदाज ख्रिस गेल यावर्षी पुन्हा एकदा पंजाब संघाकडून खेळताना दिसणार आहे. गेल 41 वर्षांचा आहे आणि ताहीरसह तो यावर्षी आयपीएल खेळणारा सर्वात जुना खेळाडू आहे.

5/5

महेंद्र सिंह धोनी

महेंद्र सिंह धोनी

क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीला ओळखलं जातं. यंदा IPLच्या 14व्या हंगामात खेळणार आहे. 39 वर्षीय धोनीने CSK संघाला आतापर्यंत 3 वेळा IPLमध्ये चॅम्पियनशिप मिळवून दिली आहे. धोनीची गणना जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंमध्ये केली जाते.