IPL 2024: यंदाच्या आयपीएलची सुरुवात मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी काही फारशी चांगली झालेली दिसली नाही. पहिल्या 3 सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर मुंबईला विजय मिळवणं शक्य झालं आहे. याशिवाय चौथ्या सामन्यात यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध झालेल्या सामन्यातही मुंबईने विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये वरच स्थान गाठलं. दरम्यान या सामन्यात पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या मनमानी करताना दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचा सिझन सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत होती. याचं कारण म्हणजे मॅनेजमेंटने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याकडे टीमची धुरा सोपवली. मुंबईच्या टीमचं कर्णधारपद मिळताच हार्दिक पंड्या सतत स्वत:ची मनमानी करत असल्याचं समोर आलं आहे. चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, याच कारणामुळे मुंबई इंडियन्सला पहिले तीन सामने गमवावे लागले. आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही पांड्या स्वतःचच खरं करताना दिसला. सामन्यादरम्यान रोहित हार्दिकला काहीतरी ओरडून सांगत होता मात्र असं असूनही हार्दिकने त्याचं ऐकलं नाही.


हार्दिकने रोहितला केलं इग्नोर


आरसीबीच्या फलंदाजीदरम्यान, दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी क्रिजवर आला तेव्हा तो त्यात ओव्हरमध्ये सतत फोर मारत होता. यावेळी रोहित शर्मा भर मैदानात हार्दिक पांड्याला ओरडून एका खेळाडूला त्या ठिकाणी उभं करण्यास सांगत होता. मात्र हार्दिक पांड्याने रोहित शर्माच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यानंतर चाहत्यांनी हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.


पुन्हा हार्दिक पांड्या झाला सोशल मीडियावर ट्रोल


या सामन्यात दिनेश कार्तिकने 23 बॉल्समध्ये 53 रन्सची खेळी केली. कार्तिकने 16व्या ओव्हरमध्ये थर्ड मॅन रिजनमध्ये 4 फोर मारले. यावेळी मोहम्मद कैफ कॉमेंट्री बॉक्समध्ये बसला होता. कॉमेंट्री करताना कैफ म्हणाला, 'रोहित शर्मा थर्ड मॅनला खेळाडू उभा करण्यास सांगत होता कारण कार्तिक तिथे शॉट मारणार. पण हार्दिक पांड्याने त्याचं ऐकलं नाही आणि दिनेश कार्तिकने तेथे 3 फोर मारले


रोहित शर्मा होणार रिटायर?


गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा रिटायर होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. अशातच एका कार्यक्रमात रोहित शर्माला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्माने सध्या मी चांगली कामगिरी करतोय, आणि पुढची आणखी काही वर्ष खेळत राहाण्याचा विचार करतोय, असं उत्तर दिलं. निवृत्तीआधी विश्व चषक जिंकण्याचं आपलं स्वप्न असल्याचंही रोहितने स्पष्ट केलं.