मुंबई : टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. टीम इंडियाने 2-1 ने इंग्लंड विरुद्धची टी 20 सीरिज जिंकली. दुसऱ्या टी 20 सामन्यात हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातील झालेल्या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याने रोहित शर्माला शिवीगाळ केल्याची चर्चा आहे. युजर्सनी सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला तुफान ट्रोलही केलं आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या रोहित शर्माला शिवीगाळ करत असल्याचा दावा ट्विटरवर चाहते करत आहेत. या व्हिडीओ मागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. 


दुसऱ्या T20 सामन्यात भारताने इंग्लंड संघाचा 49 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर हार्दिक पांड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आवाज आणि शिवीगाळ नीट ऐकू येत नाही.


व्हिडीओतला आवाज हार्दिक पांड्याचा आहे असा दावा युजर्सनी केला आहे. व्हिडीओ फक्त 10 ते 15 सेकंदांचा आहे. ट्विटरवर (#HardikAbusedRohit, #HardikPandya) चे हॅशटॅग व्हायरल होत आहेत. चाहत्यांनीही हार्दिक पांड्याला अहंकार आल्याचं म्हटलं आहे.



DRS च्या वेळीचा हा व्हिडीओ असल्याचाही दावा केला जात आहे. त्यावेळी हार्दिक पांड्या तू माझं ऐक असं रोहितला सांगत असावा असं काही क्रिकेटप्रेमींचं म्हणणं आहे. त्यामुळे या व्हिडीओवर अजूनतरी रोहित किंवा हार्दिक दोघांनीही खुलासा केला नाही. 


इंग्लंड विरुद्धच्या दोन्ही टी 20 सामन्यात हार्दिक पांड्याला सर्वोत्तम कामगिरी करण्यात यश आलं नाही. टीम इंडियाने सीरिज जिंकली मात्र तिसरा सामना गमवला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 17 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. टी-20 सीरिजमध्ये भारताच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळी केली. T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियातून कोण कोण खेळू शकतं याची झलक पाहायला मिळाली.