नागपूर : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या ५ सामन्यांच्या सीरिजमध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिलेला खेळाडू म्हणजे हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा रवि शास्त्री यांचा सल्ला फायद्याचा ठरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक सुद्धा दिलेली जबाबदारी योग्यप्रकारे निभावण्यात यशस्वी ठरतो आहे. त्यामुळे रवि शास्त्री हे त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. 


रवि शास्त्री म्हणाले की, ‘ऑलराऊंडर हार्दिक पांड्या हा जगातल्या कोणत्याही मैदानात फोर आणि सिक्सर लगावू शकतो. शास्त्रीच्या सल्ल्यानेच इंदोर येथील सामन्यात हार्दिकला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले आहे. त्यात सामन्यात त्याने ७८ रन्स केले. त्यानंतरच्या सामन्यात त्याने ४१ रन्स केले, पण हा सामना टीम इंडियाने गमावला. 


पांड्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याबाबत रवि शास्त्रीला विचारले तर तो म्हणाला की, ‘हार्दिक खतरनाक खेळाडू आहे. तो फटकेबाजी करण्यात मास्टर आहे. खासकरून स्पिनर्सना तो चांगलाच फटके मारतो. मी स्पिनरला फटके मारणारा त्याच्यासारखा खेळाडू पाहिला नाही. युवराज सिंह देखील त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात असाच होता. हे लोक जगातल्या कोणत्याही मैदानावर फोर आणि सिक्सर लगावू शकतात’.