लंडन :  चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात गोलंदाजीमध्ये खराब कामगिरी करून मोठी चूक करणाऱ्या हार्दिक पांड्याने दुसऱ्या सामन्यात बांगलादेश  विरूद्ध ८० धावांची नाबाद खेळी करून संघात आपली जागा फिक्स केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावा कुटल्या.  पहिल्या सामन्यात खराब गोलंदाजीमुळे हार्दिक पांड्यावर दडपण होते. त्यामुळे सुरूवातीला त्याने सावध खेळी केली. मग त्याने खऱ्या अर्थाने आपला जलवा दाखविला. रविंद्र जडेजाच्या मदतीने त्याने भारताला ३०० धावांच्या आसपास आणून ठेवले. 


भारताने ५० षटकात ६ बाद ३२४ धावांचा डोंगर बांगलादेशसमोर रचला आहे. 


पहिल्या सामन्यात झाली होती पांड्याकडून ही चूक 


चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना भारताने जिंकला असला तरी यात भारताचा युवा स्टार हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली त्यामुळे आता त्याच्या हातून एक सुवर्णसंधी हिसकावून घेतली जाऊ शकते. 


एक्सपर्टनुसार पांड्याने गोलंदाजीवेळी केलेल्या चुकीमुळे त्याला गोलंदाज म्हणून संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तो टीममध्ये असेल पण फलंदाज म्हणून असू शकतो. पण कर्णधार विराट कोहली त्याला तेज गोलंदाज म्हणून संधी देणार नाही. हार्दिकने ज्या लेंथवर गोलंदाजी केली, ती लेंथ ब्रिटीश पिचवर यशस्वी ठरत नाही. 


पहिल्या सामन्यात पांड्याने एकूण ६ ओव्हर टाकल्या त्यात त्याने ४९ धावा दिल्या. ल्यूक रॉंकी आणि केन विल्यमसन यांनी खूप धावा काढल्या. कोहली आणि भारतीय संघाचा कोच अनिल कुंबळे याला वाटते की हार्दिक आपली लेंथमध्ये बदल केला नाही. भुवनेश्वर, शमी आणि उमेश यादव याने ज्या प्रकारे गोलंदाजी केले, तसे करण्यात हार्दिक कमी पडला.