नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वनडे सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने भारताच्या ३ विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सर्वांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशात आता टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यानेही हार्दिक पांड्याचं भरभरून कौतुक केलं आहे. 


राहुल द्रविड एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, ‘हार्दिकने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या आताच्या सीरिजमध्ये परिस्थीतीनुसार खेळ करून आपल्या करिअरचा मार्ग बदलला आहे. पांड्या त्याच्या सिक्सर मारण्याच्या क्षमतेमुळे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यांमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे’. 


पांड्याने तीन सामन्यांमध्ये सामना जिंकवणारे २ अर्धशतके केली. पहिल्या वनडेत त्याने महेंद्र सिंह धोनीसोबत ८३ रन्सची दमदार खेळी केली. तर तिस-या वन डेमध्ये त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आल्यावरही ७८ रन्सची दमदार खेळी केली. यावर द्रविड म्हणाला की, ‘जेव्हा तो चौथ्या नंबरवर बॅटींग करतो, तेव्हा तो वेगळ्याप्रकारे खेळतो. जर सहाव्या क्रमांकावर आला तर तेव्हाही तो वेगळ्याप्रकारे खेळतो. यातून त्याची परिपक्वता दिसून येते आणि प्रेक्षकांनाही हेच पाहायचं असतं’.


राहुल पुढे म्हणाला की, ‘मी नेहमीच नैसर्गिक खेळाबाबत ऎकत असतो. पण यामुळे मला निराशा होते. कारण नैसर्गिक खेळासारखी कोणतीच गोष्ट नसते. हे केवळ परिस्थीतीनुसार खेळणं असतं. पांड्यात याबाबतीत खूप चांगलं उदाहरण आहे. तो वेगवेगळ्या परिस्थीतींमध्ये चांगला खेळतो’.