IND vs NZ : माझी इच्छा आहे की...; Hardik Pandya ने फलंदाजांना केली खास रिक्वेस्ट
दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने फलंदाजांना खास रिक्वेस्ट केली आहे.
Hardik Pandya IND vs NZ T20 Series: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने 65 रन्सने न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारने या सामन्यात 111रन्सची नाबाद खेळी केली. तर दिपक हुड्डाने (Deepak Hooda) देखील चांगला खेळ केला. सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या खूप खूश होता.
दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने फलंदाजांना खास रिक्वेस्ट केली आहे. पंड्याच्या म्हणण्यानुसार, गोलंदाज नेहमीच यशस्वी होतील असं नाही. मात्र फलंदाजांनीही गोलंदाजीसाठी पुढाकरा घेतला पाहिजे. जेणेकरून टीमसाठी गोलंदाजीला चांगचे पर्याय उपलब्ध असतील. दीपक हुड्डा मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे, मात्र तो उत्तम पद्धतीने गोलंदाजी करू शकतो.
हार्दिककडून सूर्यकुमारची तारीफ
हार्दिक पंड्या पुढे म्हणाला, मैदान फार ओलं होतं त्यामुळे श्रेय गोलंदाजांना देखील देईन. मी स्वतः गोलंदाजी केली आहे आणि भविष्यात मला गोलंदाजीचे आजून पर्याय पाहायला आवडतील. असं नाही की, ही गोष्ट नेहमीच यशस्वी असेल. मात्र, माझी इच्छा आहे की, फलंदाजांनीही गोलंदाजीकडे लक्ष दिलं पाहिजे.
तिसऱ्या टी-20 पूर्वी न्यूझीलंडला धक्का
न्यूझीलंडचा कर्णधार तिसऱ्या सामन्यात संघाबाहेर जाणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) पूर्व-नियोजन केलेल्या वैद्यकीय भेटीमुळे नेपियर येथे भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यातून बाहेर पडला आहे.
याबाबत न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ब्लॅककॅप्सचा कर्णधार केन विलियम्सन मंगळवारी नेपियरमध्ये पूर्व-नियोजन केलेल्या वैद्यकीय तपासणीकरिता जाणार असून तिसरा टी-20 सामना खेळू शकणार नाही. "
ऑकलंड एसेसचा फलंदाज मार्क चॅपमन टी-20 संघात सामील होणार आहे. ऑकलंडमध्ये शुक्रवारी ईडन पार्कवर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी विलियम्सन बुधवारी पुन्हा संघात सामील होईल.