World Cup 2023 : टीम इंडियाला दुसरा धक्का! प्रॅक्टिस सेशनमध्ये Hardik Pandya ला दुखापत; रोहितचं टेन्शन वाढलं
Cricket World Cup 2023 : टीम इंडियाला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) नेट प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त (injury) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Hardik pandya injury : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी (Cricket World Cup 2023) सज्ज झाला आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात (India vs Australia) दोन हात करणार आहे. चैन्नईच्या मैदानात दोन्ही संघात भिडत होणार असून त्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला (Indian cricket team) दोन धक्के बसले आहेत. टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shbubam Gill) याला डेंग्यू झाल्याने तो पहिले काही सामने मुकण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) नेट प्रॅक्टिस करताना दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल झाली. भारतीय खेळाडूंनी सरावही सुरु केला. सरावाचे फोटो व्हायरल झाले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, यांच्यासह सर्वच खेळाडूंनी सरावात भाग घेतला होता. भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये टीम इंडिया प्रॅक्टिस करताना दिसली. यावेळी हार्दिक पांड्याच्या हातांना पट्टी केल्याचं दिसत होतं. त्याच्या बोटांना दुखापत झाल्याचं समजतंय. RevSportz ने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यापूर्वी नेट सराव करताना जखमी झाला.
फलंदाजीचा सराव करत असलेल्या हार्दिकच्या बोटावर वेगवान चेंडू लागला आणि त्यानंतर त्याने पुढे फलंदाजी केली नाही. मात्र, दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. खबरदारी म्हणून सराव न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हार्दिकची दुखापत किती गंभीर आहे, याचा विचार टीम इंडिया पहिल्या सामन्यापूर्वी करेल, अशी शक्यता व्यक्त केली जातीये. दरम्यान, हार्दिक टीम इंडियामध्ये नसेल तर कोणत्या खेळाडूला टीममध्ये संधी दिली जाईल? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसतोय.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (व्हाईस कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.