Rohit Sharma Virat Kohli : टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या संघाकडून पराभव झालेला असतानाच भारतीय संघ झाल्या गोष्टी विसरत पुन्हा नव्यानं सुरुवात करताना दिसला. इथं खेळाडू त्यांच्या परीनं झाल्या चुका सुधारत असतानाच तिथं निवड समितीसुद्धा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काळात संघाची सूत्र ही नव्या जोमाच्या तरुण खेळाडूंच्या हाती दिली जाणार आहेत. त्यामुळं नाही म्हटलं तरीही विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासाठी ही धोक्याची बाब ठरू शकते. कारण, त्यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीनं हा एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. 


गेल्या 10 वर्षांपासून संघात मोलाचं योगदान, पण.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Virat Kohli, Rohit Sharma) विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंनी गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या खेळानं भारतीय संघात मोलाचं योगदान दिलं आहे. पण, आता मात्र बीसीसीआय 2024 मधील टी20 वर्ल्डकपसाठी तरुण खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत दिसत आहे. याच धर्तीवर कर्णधारपद (Hardik Pandya) हार्दिक पांड्याच्या हाती जाऊ शकतं. विराट आणि रोहित या दोघांच्याही कारकिर्दीत हार्दिकला त्यांनी कायमच महत्त्वं दिलं.


हेसुद्धा वाचा : 'फक्त तुझेच आभार मानतोय....'; पत्नी- लेकिसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक 


वेळप्रसंंगी संघाची मोठी जबाबदारीही त्या दोघांनी हार्दिकवर सोपवली. पण, आता हाच हार्दिक त्या दोघांचीही जागा घेणार असल्याचीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. 


 


विराट- रोहितच्या भविष्यावर बोलू काही.... 


अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार चेतन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली तयार करण्यात आलेल्या एका (BCCI) समितीपुढे विराट आणि रोहितच्या भविष्यातील कारकिर्दीविषयी चर्चा केली जाणार आहे. टी20 सामन्यांमध्ये या दोन्ही खेळाडूंची भूमिका नेमकी कितपत महत्त्वाची असेल याचीच चर्चा तिथं होणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी पुढच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रस दाखवला असला तरीही निवड समितीचा कल मात्र हार्दिक पांड्याकडेच असल्याचं दिसत आहे. 


रोहितला शह देणार पांड्या? 


ज्यावेळी हार्दिकला श्रीलंकेविरोधात (Ind vs Srilanka) नुकत्याच पार पडलेल्या टी20  (T20 Matches) सामन्यांसाठीचं कर्णधारपद देण्यात आलं होतं तेव्हाच त्यानं रोहितला शह देत त्याची जागा घेतल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट आणि सध्या कर्णधारपद भूषवणारा रोहित टी20 संघात सहभागी नव्हते. त्यामुळं या दोघांच्याही करिअरचे शेवटचे दिवस सुरु झाले आहेत का? असाच प्रश्न काही क्रिकेटप्रेमींनी उपस्थित केला.