Virat Kohli : 'फक्त तुझेच आभार मानतोय....'; पत्नी- लेकीसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक

Virat Kohli : विराटनं व्यक्त केलेल्या भावना प्रत्येक पित्याच्या मनात असाव्यात... त्याचे शब्द वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी. मुख्य म्हणजे विराटनं जे काही केलंय ते इतकं अनुकरणीय आहे की तुम्हालाही पटेल. 

Updated: Jan 10, 2023, 10:47 AM IST
Virat Kohli : 'फक्त तुझेच आभार मानतोय....'; पत्नी- लेकीसोबतचे क्षण पाहून विराट कोहली भावूक

Virat Kohli : भारतीय क्रिकेट विश्वामध्ये शून्यापासून सुरुवात करत आपल्या लोकप्रियतेचं आणि खेळाच्याच बळावर आपल्या अस्तित्वाचं साम्राज्य उभं करणारं एक नाव म्हणजे विराट कोहली (Virat Kohli Cricket). एक खेळाडू म्हणून विराटनं जो नावलौकिक कमवला, तोच सध्या तो एक पिता आणि एक पती म्हणून कमवू पाहत आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) हिच्यासोबत काही वर्षांपूर्वी विराटनं संसाराची सुरुवात केली. पाहता पाहता त्याच्या या कुटुंबाला पूर्णरुप मिळालं ते म्हणजे लेकिच्या म्हणजेच वामिकाच्या जन्मानंतर. एक मुलगा, खेळाडू, पती, पिता म्हणून तो सध्या चौफेर भूमिका निभावताना दिसत आहे. तोल डगमगतोय पण, तरीही आपल्या माणसांच्या आधारानं तो सावरातना दिसत आहे. (Cricketer Virat Kohli shares an emotional post with wife anushka sharma and daughter vamika ) 

विराटची भावनिक बाजू डोळ्यात पाणी आणणारी 

एरव्ही विराट कोहली हे नाव घेताच प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना घाम फुटतो. खेळाप्रती प्रचंड एकनिष्ठ असणाऱ्या विराटची आक्रमकता आहेच तशी. पण, त्याची भावनिक बाजू डोळ्यात पाणी आणणारी हे मात्र नाकारता येत नाही. घरातला कर्ता पुरुष जेव्हा भावनिक होतो तेव्हा भल्याभल्यांचं मन पाघळतं. इथेही तेच झालं. 

(Virat Kohli shares photo with wife and daughter) विराटनं सोशल मीडियावर अनुष्का आणि वामिकासोबतचा एक फोटो पोस्ट केला. यामधून लेकिचा चेहरा इतक्यात माध्यमांमोर येणार नाही याचीही त्यानं काळजी घेतली. फोटोमध्ये तो, अनुष्का आणि वामिका एकमेकांचा हात पकडून समुद्रकिनाऱ्यावरून वाळूत चालताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : IND vs SL: जसप्रीत बुमराहला झालंय तरी काय?, कॅप्टन रोहितच्या वक्तव्यामुळे चिंता वाढली!

फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'रब्बा बक्षियां तू एन्नानियां मेहेरबानियां, होर तेरको कुछ नी मंगदा, बस तेरा शुकर अदा करदां'. याचा अर्थ इतका सुरेख आहे, की खरंच विराटचे हे शब्द आपल्याही मनाचा ठाव घेत आहेत. देवानं मला इतक्या गोष्टी दिल्या आहेत की, माझ्या मनात इतक कोणत्याही कामना- इच्छा नाहीत. देवा मी फक्त आभार मानू इच्छितो... असं म्हणत त्यानं कृतज्ञता व्यक्त केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट फारसा पसंत न करणारेही म्हणतात... 

आयुष्यात तुम्हाला सर्वकाही मिळेल, फक्त कृतज्ञता व्यक्त करायला शिका. प्रत्येक लहानसहान गोष्टींप्रती कृतज्ञ राहा, प्रत्येकाचे आभार माना, ही नियती पाहा तुम्हाला कशी सुखात ठेवते हेच जणू विराटनं त्याच्या कॅप्शनच्या माध्यमातून सांगितलं. त्याचे शब्द अनेकांनाच पटले आणि ज्यांना तो फारसा आवडत नाही त्यांनीसुद्धा त्याचं कौतुक केलं.