बडोदा : भारतीय टीमचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीमच्या बाहेर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत ४ बॉलर घेऊन मैदानात उतरला होता. भारतानं हार्दिक पांड्याला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात ऑलराऊंडर म्हणून खेळवलं होतं. त्यामुळे भारताची टीम संतुलित होती. पण सप्टेंबर महिन्यात आशिया कपमध्ये पाठीला दुखापत झाल्यामुळे पांड्याला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजला मुकावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाठीला झालेल्या दुखापतीमुळे हार्दिकला आत्तापर्यंत क्रिकेट खेळला नव्हता. पण आता १४ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्ये हार्दिकची बडोद्याच्या टीममध्ये निवड झाली आहे. हार्दिक पांड्या कधी फिट होईल याबाबत मात्र अजून बीसीसीआयकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी तरी हार्दिक फिट होईल का याबाबत प्रश्नचिन्ह आहे.


बडोद्याच्या टीममध्ये हार्दिक


१४ डिसेंबरला बडोदा आणि मुंबईमध्ये रणजी ट्रॉफीची मॅच होणार आहे. या मॅचसाठी हार्दिकची बडोद्याच्या टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होईल. हार्दिकबरोबरच युसुफ पठाणही बडोद्याच्या टीममध्ये आहे.


बडोद्याची टीम


केदार देवधर, आदित्य वाघमोडे, विष्णू सोळंकी, युसुफ पठाण, स्वप्निल सिंग, भार्गव भट, सोएग ताई, ऋषी अरोठे, लुकमान मेरीवाला, शिवालिक शर्मा, मितेश पटेल, धीरेन मिस्त्री, सोएब सेपरिया, प्रत्युष कुमार, हार्दिक पांड्या