चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार ८३ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टॉप फळीतील फलंदाज झटपट बाद होत असताना धोनी आणि पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत ११८ धावांची भागीदारी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सामना जिंकल्यानंतर पांड्याने आपल्या खेळीचे श्रेय धोनीला दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळीबाबत बोलताना पांड्या म्हणाला, जेव्हा आम्ही दोघे खेळपट्टीवर होतो तेव्हा सतत एकमेकांशी चर्चा करत होतो. यामुळेच दोघांमध्ये ११८ धावांची भागीदारी होऊ शकले. पहिल्या ६ ओव्हरमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर संघावर दबाव होता. यावेळी धोनीने मला खेळपट्टीवर टिकून राहत मोठी खेळी करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला स्ट्राईक रोटेट करत आम्ही धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. आमचे सुरुवातीला २३० धावांचेच लक्ष्य होते. 


पांड्या पुढे म्हणाला, आजही धोनीसारखा फिनिशर दुसरा कोणी नाही. ड्रेसिंग रुममध्ये धोनीच्या उपस्थितीत खूप काही शिकायला मिळते.