गाले : टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणे कोणत्याही खेळाडूसाठी दडपणाचं असतं. मात्र टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याचा पहिल्याच टेस्टमधील दमदार खेळ पाहता तो वन डे खेळत असल्याचे दिसले. पंड्याने ४९ बॉल्समध्ये ५० रन्स केलेत ज्यामुळे टीम इंडियाने वेगाने ६०० रन्स जमवलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचा परिणाम म्हणजे कर्णधार विराट कोहली याला पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेच्या बॅट्समनना माघारी पाठवण्यासाठी अतिरीक्त ओव्हर्स मिळाले. पंड्याने त्याच्या हा पहिल्या टेस्टचा अनुभवही शेअर केला. 


पंड्याला त्याच्या पहिल्या टेस्टसाठी त्याने आधी काय तयारी केली याबाबत विचारले असता सांगितले की, "जेव्हा मी मैदानात बॅटींग करत होतो तेव्हा मला मी वन डे मॅचमध्ये बॅटींग करत असल्यासं जाणवलं. माझ्या सगळंकाही परफेक्ट होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटर असल्याने तयारीच्या बाबतीत तुम्हाला थोडं स्मार्ट बनावं लागतं. मानसिकतेत बदल करणेही गरजेचं असतं. मात्र एकंदर कौशल्यात कोणताही बदल होत नसतो’. 


पंड्याच्या खेळाचं कौतुक अनेक खेळाडूंकडून केलं जातं. पंड्याचा सिनिअर चेतेश्वर पुजारा याला वाटतं की, पंड्या हा एकाच ओव्हरमध्ये सहा सिस्कर मारण्याच्या युवराज सिंहच्या रेकॉर्डसोबत बरोबरी करू शकतो. तो एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर मारणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरू शकतो.


पुजाराने पंड्याला एका टिव्ही मुलाखतीत गंमतीने याबाबत विचारले होते. तेव्हा पंड्या म्हणाला होता की, ‘मी एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर लगावण्याबाबत अजून विचार केला नाहीये. मी तीन बॉलमध्ये तीन सिक्सर लगावले होते. मात्र चौथ्या बॉलवर सिक्सर लगावण्याचा प्रयत्न केला नव्हता कारण त्याची गरज नव्हती. जर पुढे एखाद्या दिवशी अशी स्थिती आलीच तर मी नक्कीच सहा बॉलवर सहा सिक्सर लगावेल’.


पंड्याने सांगितले की, मला हे चांगलेच माहित आहे की, जेव्हा भारत उप महाद्वीपच्या बाहेर जसे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा दौरा करण्यासाठी त्याला चांगली तयारी करावी लागते. दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यासाठी वेगळ्याप्रकारच्या तयारीची गरज आहे. जे इतकं सोपं नाहीये. बॉल स्वींग करेल, त्यानुसार तयारी करावी लागते’.