मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्या अनेक कारणांमुळे सतत चर्चेचा भाग बनलेला असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी परिणीती चोप्राच्या एका ट्विटला रिप्लाय दिल्यानंतर, त्यानंतर शिबानी दांडेकर सोबतचे चॅटस आणि अगदी काही दिवसांपूर्वी एका मुलीसोबतचा फोटो पाहून अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र ज्या मुलीसोबत हार्दीक पांड्याने फोटो शेअर केला होता ती हार्दीकची बहीण असल्याचा खुलासा केला होता.


आता पुन्हा हार्दिक पांड्याने एका स्पेशल मुलीसोबतचा सेल्फी क्लिक केला आहे. आणि ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून मॉडर्न इंडियाची आयकॉन 'अमुल गर्ल'आहे. 
'अमुल गर्ल' सतत ताज्या घडामोडींवर आपल्या खास शैलीतून भाष्य करत असते. 



 


हार्दिक पांड्यानेदेखील 'अमुल गर्ल' सोबतचा सेल्फी खास असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


१९६६ पासून अमुल गर्लने अनेक अ‍ॅड कॅम्पेन्समध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये काही अ‍ॅड्स वादग्रस्तदेखील ठरल्या. हार्दिक पांड्या त्याच्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. त्याचा खेळ पाहता पुढील 'कपिल देव' असादेखील त्याचा उल्लेख केला जातो.