Rahul Tripathi Misfleid : शुक्रवारी भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यातील टी-20 सीरिजचा पहिला सामना खेळवण्यात येतोय. रांचीमध्ये हा सामना खेळण्यात येत असून हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीमचं नेतृत्व करतोय. टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र याचवेळी युवा खेळाडू राहुल त्रिपाठीने वॉशिंगटन सुंदरच्या मेहनतीवर पाणी फेरलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, राहुलच्या मिस फील्डमुळे किवींचा ओपनर फलंदाज फिन ऐलनची विकेट जाता जाता राहिली. राहुलच्या या मिसफील्डचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान राहुलने केलेल्या चुकीवर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या राहुलवर संतापलेला दिसला.


Rahul Tripathi च्या चुकीने फेरलं वॉशिंगटनच्या मेहनतीवर पाणी


न्यूझीलंडच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये वॉशिंगटन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. यावेळी पहिला आणि दुसरा बॉल त्याने फिन ऐलनला टाकला, ज्यावर तो रन घेऊ शकला नाही. तिसऱ्या बॉलवर फिनने कव्हरच्या दिशेने हवेत शॉट मारला. 



यावेळी तिथे उभ्या असलेल्या राहुल त्रिपाठीने बॉल पकडला मात्र फिल्डरच्या हातून तो खाली पडला आणि फलंदाजाला जीवदान मिळालं. हा मिसफिल्ड झाल्यानंतर राहुलला वाईट वाटणं तर दूरच तो हसताना कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजावर चांगलाच संतापलेला दिसला. 


टीम इंडियाला जिंकण्यासाठी 177 रन्सचं आव्हान


न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंगला 27 रन्स मारले. किवींकडून मिचेल आणि कॉन्वे या दोघांनीही अर्धशतक झळकावलं आहे. 


पहिल्या टी-20 साठी भारताची प्लेईंग 11


हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, शिवम मावी, उमरान मलिक