हार्दिक पांड्याच्या घरी लगीनघाई सुरू !
भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याच्या घरी लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे. पण ही घाई हार्दिकसाठी नव्हे तर त्याचा भाऊ कृणाल पांड्यासाठी आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याच्या घरी लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे. पण ही घाई हार्दिकसाठी नव्हे तर त्याचा भाऊ कृणाल पांड्यासाठी आहे.
आयपीएलच्या दहाव्या हंगामामध्ये मुंबई इंडियंस संघाकडून कुणाल खेळला. आता २६ वर्षीय कृणाल पंखुडी शर्मासोबत लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. 27 डिसेंबर रोजी हा विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे.
पंखुडी आणि कृणाल गेली दीड वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.त्यानंतर आता ते लग्न करण्नार आहेत.
कुठे होणार विवाहसोहळा
कृणाल आणि पंखुडीचे लग्न सांताक्रुझ येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. तेथेच रिसेप्शन सोहळाही पार पडेल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडेल अशी माहिती कृणालने टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.
कृणाल दुखापतग्रस्त असल्याने तो सध्या रणजीपासून दूर आहे. सध्या तो फिटनेस वाढवतोय.
खास लव्ह स्टोरी
आयपीएलच्या दहाव्या हंगामात पंखुडीला कृणालने प्रपोज केले होते. या सामन्यात कृणालला मॅन ऑफ द मॅच म्हणूनदेखील घोषित केले होते. त्यामुळे या संधीचा फायदा उठवत त्याने पंखुडीला प्रपोज केले.