मोगा - पंजाब : महिला वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौर हिनं नॉटआऊट 171 रन्सची आक्रमक खेळी खेळलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 फोर आणि सात सिक्सचा समावेश असलेल्या इनिंगनं तमाम क्रिकेट रसिकांची मनं जिंकलीत. हरमनप्रीतच्या या आक्रमक खेळीमुळेच भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल जिंकत फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केलाय.


हरमनप्रीतच्या या खेळीवर तिच्या कुटुंबियांनाही सार्थ अभिमान आहे. या खेळीनंतर आणि भारताच्या विजयावर हरमनप्रीतच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाय.