IND W vs AUS W: गुरुवारी केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India vs Australia) रोमांचक सामन्यात 5 रन्सने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या टीमने अंतिम फेरीत (Women's T20 World Cup 2023 Final) प्रवेश केलाय. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सर्वाधिक रन्स केले. मुळात ती जोपर्यंत क्रीजवर होती तोपर्यंत टीम इंडिया (Team India) विजयी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती रनआऊट होताच टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरमनप्रीतने 34 बॉल्समध्ये 52 रन्सची खेळी केली. यावेळी अत्यंत दुर्देवीरित्या हरमन रनआऊट झाली. तिच्या या रनआऊटमुळे संपूर्ण भारत देश हळहळला. मात्र यावेळी इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसैन यांनी तिच्यावर टीका केलीये. हुसैन यांच्या म्हणण्याप्रमाणे, हरमनप्रीतने अगदी शाळकरी मुलीसारखी चूक केली आहे. दरम्यान तिनेही हुसैन यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. 


हरमनप्रीतचं हुसैन यांना प्रत्युत्तर


हरमनप्रीतने तिचं अर्धशतक पूर्ण केलं आणि टीम इंडियाची बुडती नौका वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र टीम इंडियाला केवळ 167 रन्स करता आले. सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, असं म्हणाले का ते? याबाबत मला माहिती नाही. पण त्या ठिकाणी काहीतरी घडलं. क्रिकेट सामन्यांमध्ये मी अनेकदा फलंदाजांसोबत असं घडताना पाहिलं आहे. तिची बॅट अडकली. माझ्यासाठी हा फार अनलकी दिवस होता.


हरमनप्रीत सोबत नेमकं काय घडलं?


टीम इंडियाच्या कर्णधारासोबत जे घडलं, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 15 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हरमनप्रीतन रन घेण्यासाठी गेली. क्रीझमध्ये पोहोचण्यापूर्वी बॅट मातीमध्ये रुतली आणि अडकली. बॅट एवढी जोरात रुतली होती की ती काढणं कठीण होतं. यामुळे हरमनप्रीत रनआऊट झाली.


काय म्हणाली Harmanpreet Kaur ?


ज्यावेळी पोस्टमॅच प्रेझेंटेशन (Postmatch presentation) सुरू होतं. त्यावेळी हरमनप्रित कौरने डोळ्यांवर गॉगल घातला होता. त्यावेळी तिला कारण विचारलं गेलं. माझ्या देशाने मला रडताना पाहावं, असं मला वाटत नाही, म्हणूनच मी हा चष्मा घालून आले आहे, असं स्पष्टीकरण हरमनप्रीतने यावेळी दिलंय.