डर्बी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने जबरदस्त अर्धशतक झळकावलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६४ चेंडूत तिने ६ चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा चोपल्या. वर्ल्डकपमधील तिचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. तिच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावरच भारताने १०० धावांचा टप्पा ओलांडलाय. 


याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही तिने अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात भारताचा १८६ धावांनी विजय झाला होता.