England vs Australia, 1st Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Eng vs Aus) यांच्यात एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या अॅशेसच्या (The Ashes 2023) पहिल्या कसोटीत इंग्लंडने आपलं वचर्स्व निर्माण केलंय. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स (Ben Stokes) याचा डाव घोषित करण्याचा धाडसी निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. बेन स्टोक्सने गुरुवारी टीम इंडियाचा पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला होता. पहिल्याच दिवशी डाव घोषित केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर स्टोक्सचा निर्णय फेल ठरवू शकतो, असं देखील म्हटलं जात आहे. अशातच आता अनुभवी समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय.


काय म्हणाले हर्षा भोगले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला अनेक पिढ्यांतील खेळाडू पाहण्याची संधी मिळाली आहे. आजही असे खेळाडू आहेत, ज्यांच्या मनात डोकावायला मला आवडेल. मागील काळात तो एमएस धोनी होता आणि आता बेन स्टोक्स आहे. स्टोक्स ज्या प्रकारे कसोटी क्रिकेट खेळत आहे ते पाहून मी मंत्रमुग्ध झालोय, असं हर्षा भोगले (Harsha Bhogle On Ben Stokes) म्हणाले आहेत.


कॅप्टन स्टोक्सने शुक्रवारी दुसऱ्या दिवशी गोलंदाजीत बदल करून क्रिकेटपंडितांना आश्चर्यचकित केलं होतं. त्यामुळे त्याच्या निर्णयावर सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा होताना दिसते. डाव घोषित करण्याचा निर्णय असो वा गोलंदाजीतील बदल. नेमका निर्णय कोणाचा होता? बेन स्टोक्सचा कि कोच ब्रँडन मॅक्युलमचा? यावर सवाल उपस्थित केले जात आहेत. अशातच आता  हर्षा भोगले यांच्या ट्विटमुळे अनेकांचा दृष्टीकोन बदलल्याचं दिसून येतंय.


आणखी वाचा - Bazball म्हणजे काय रे भाऊ? शब्द कसा तयार झाला?


दरम्यान, एकाच वर्षात दोनवेळा पहिल्याच दिवशी आपला डाव घोषित करणारा इंग्लंडचा हा क्रिकेट विश्वातील पहिलाच संघ ठरला आहे. आतापर्यंत 146 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात ही गोष्ट यापूर्वी कधीच घडली नव्हती. इंग्लंडने पहिला डाव 393 धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने देखील कडवी टक्कर दिली आहे. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाने 305 धावांवर 5 विकेट गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) 126 धावांची झुंजार खेळी केली. तर अॅलेक्स (Alex Carey) 46 धावांवर खेळतोय.