Kashmir Premier League : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षेल गिब्ज (Herschelle Gibbs) याने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourabha Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर प्रीमियर लीगमध्ये (KPL) सहभागी होऊ नये साठी सौरभ गांगुली आणि जय शहा यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा दावा हर्षेल गिब्ज यांनी केला आहे. काश्मीर लीगमध्ये सहभागी झाल्यास भविष्यात भारतीय क्रिकेट बोर्डासोबत कधीच काम करता येणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोपही गिब्जने केला आहे.


दक्षिण आफ्रिका क्रिक्रेट बोर्डाचा (South Afrcia Cricket Board) संचालक ग्रॅहम स्मिथकडून जय शहा यांनी हा संदेश पाठवला होता. यात काश्मीर प्रीमिअर लीगमध्ये सहभागी झाल्यास भारतात काम करु दिलं जाणार नाही, असं म्हटलं होतं. 


यानंतर आपण सौरभ गांगुली यांच्याशी संपर्क साधला, तुम्ही या गोष्टीला राजकीय रंग देत आहात, मी राजकारणी नाही, ही गोष्ट अन्यायकारक असल्याचं आपण सौरभ गांगुलीला सांगितलं, त्यांनी ही गोष्ट मान्य केल्याचा दावाही गिब्ज याने केला आहे. 


हर्षेल गिब्जने इंस्टाग्रामवर काश्मीर प्रीमियर लीग सीझन 2 सुर होणार असल्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत हर्षेल गिब्ज याने कॅप्शनमअये लिहिलंय, दुबईमध्ये KPL T20 चा सीझन 2 लाँच झाला, त्याचा पुन्हा एकदा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. 


केपीएलचा वाद
पाकिस्तानात होणारी काश्मीर प्रीमियर लिग सुरु होण्याआधीच वादात सापडली होती.  या टी20 स्पर्धेला मान्यता न मिळण्यासाठी बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहिलं होतं.