Rohit Sharma Birthday: कॅप्टनच्या बर्थडेला MI ने शेअर केला खास Video, `हिटमॅन` नाव नाही तर...
MI shares a special video : मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कर्णधार आणि फलंदाजीचं खूप कौतुक करण्यात आलंय.
Rohit Sharma Birthday : टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आत्तापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावलंय. डबल सेच्यूरी झळकावणं म्हणजे डोक्यावरून पाणी, पण मुंबईच्या या पोरानं तीनवेळा अशी कामगिरी करून दाखवली आहे. आज रोहित भारतीय संघाची धुरा सांभाळतोय. सर्वांच्या लाडका रोहित शर्मा (Rohit Sharma Birthday) आज आपला 36 वा बर्थडे साजरा करत आहे. त्यानिमित्त त्याच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच मुंबई इंडियन्सने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणजे मुंबई इंडियन्स... एक दोन नाही तर पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावणारा संघ. यंदा दहाव्यांदा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भुषवतोय. 2013 मध्ये रोहितच्या खांद्यावर मुंबई इंडियन्सची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यात 9 सिझनमध्ये रोहितने मुंबईला 5 वेळा चॅम्पियन बनवलंय. अशातच आता कॅप्टनच्या बर्थडेला मुंबईने भन्नाट व्हिडिओ शेअर (Mumbai Indians Share Video) केलाय.
आणखी वाचा - Team India: ज्याची भीती होती तेच झालं, WTC Final पूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी!
मुंबई इंडियन्सने सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कर्णधार आणि फलंदाजीचं खूप कौतुक करण्यात आलंय. या व्हिडिओच्या कॅप्शन वरून रोहित शर्माचं कर्तृत्व मुंबईला आपल्या कॅप्टनवर किती अभिमान आहे, याची प्रचिती होते. हिटमॅन (Hitman) फक्त नाव नाही तर देशाचं इमोशन आहे, असं कॅप्शन मुंबईने दिलंय.
पाहा Video
रोहितच्या वाढदिवसानिमित्त वानखेडे मैदानावर वातावरण विशेष असणार आहे. रोहितचे फॅन्स देखील सामना पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. रोहितने शनिवारी वानखेडे वर फोटोशूट केलं. त्यानं आयपीएलमध्ये जिंकलेल्या पाचही ट्रॉफीसोबत फोटोशूट केलं. त्यावेळी त्याने मुंबई इंडियन्सचा खास टी-शर्ट देखील घातला होता.
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाणारा सामना खास असणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) खेळवला जाणार आहे. 30 एप्रिलला म्हणजे रोहितच्या वाढदिवशी हैदराबादमध्ये रोहितचं 60 फूट उंच कटआऊट लावलं जाणार आहे. त्यामुळे आता रोहितच्या चाहत्यांचा अभिमान गगनात मावेना झालाय.