ढाका : भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील दुसरी मॅचही भारतीय टीमने जिंकत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा ४-० ने पराभव करत भारतीय हॉकी टीमने थेट फायनल मॅचमध्ये धडक मारली आहे.


शनिवारी ढाकामध्ये सकाळपासून पाऊस पडत होता. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता सुरु होणारी मॅच ६.३० वाजता सुरु झाली. मॅचच्या सुरुवातीला भारतीय टीमने आक्रमकता दाखवली. त्यानंतर पाकिस्तानच्या टीमनेही आक्रमक खेळ केला. मग शेवटी भारतीय टीमने आक्रमक खेळ करत पाकिस्तानवर ४-०ने विजय मिळवला.


मॅचच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात दोन्ही टीम्सला एकही गोल करता आला नाही. तर तिसऱ्या सत्रात ३९ व्या मिनिटाला भारताच्या सतबीरने गोल केला. त्यामुळे भारतीय टीमने पाकिस्तानवर १-० ने आघाडी घेतली.


त्यानंतर, भारतीय टीमने एक-एक करत एकामागोमाग एक आणखीन तीन गोल केले. अशा प्रकारे भारतीय हॉकी टीमने पाकिस्तानवर ४-०ने विजय मिळवला. 


पाकिस्तानच्या टीमला पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही त्यांना गोल करण्यात अपयश आलं. पहिल्या सत्रात दोन्ही टीम्सला गोल करण्यात अपयश आलं.


या मॅचच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या टीमला एकूण चार पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र, त्यांना भारतीय टीमवर गोल करण्यात यश आलं नाही.