मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : कोणत्याही टेनिस खेळाडूच्या करिअरमध्ये जसं कोचचं महत्त्व असतं तसंच टेनिस मार्करची भूमिकाही महत्त्वाची असते. म्हणूनच मुंबईतील काही महत्त्वाच्या मार्करना टेनिस कोच ताहीर अली यांनी सन्मानित केलं. मुंबईत प्रथमच टेनिस मार्करच्या मेहनतीला गौरवण्यात आलंय.


'टेनिस मार्कर' म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ्या टेनिस खेळाडूंना घडवण्यात अमुक-तमुक कोचचं योगदान असल्याचं आपण नेहमीच ऐकतो. पण यात नेहमीच दुर्लक्षित राहतो तो टेनिस मार्कर... आता टेनिस मार्कर म्हणजे कोण? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. टेनिस मार्कर म्हणजे जो स्वतः हातात रॅकेट घेतात आणि कोर्टवर उतरतात. ते एकप्रकारे खेळाडूचे प्रतिस्पर्धी बनतात आणि विविध storks, volley, smash सर्विस करतात. ते प्रत्यक्ष खेळाडुंशी खेळून त्यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी मदत करतात. एकप्रकारे प्रमुख कोच या मार्करकडे खेळाडूंना घडवण्यासाठी सोपवतात.


मुंबईत गौरव  


यामुळेच टेनिस कोच ताहीर अली यांनी मुंबईतील सुधीर गोठे, जनार्धन सकपाळ, रमेश शिंदे, तुलसी राठोड आणि सुभाष साळवी या मार्करना त्यांच्या टेनिसमधील योगदानाबद्दल सन्मानित केलं.


विशेष म्हणजे हे मार्कर पूर्वी बॉलबॉय होते. मग ते मार्कर झाले. जनार्धन सकपाळसारखे तर बॉलबॉय ते मार्कर आणि आता तर मार्कर ते कोच बनले आहेत. सध्या ते जुहू-विलेपार्ले जिमखान्यात चांगले टेनिस खेळाडू घडवत आहेत. 


लहान मुलांमधील गुणवत्तेला योग्य आकार देण्याचं आणि मोठ्या खेळाडूंना टेक्निक शिकवण्याचं काम हे मार्कर करतात. एकप्रकारे हे मार्कर टेनिसची सेवा करत असून टेनिसमधील त्यांचं योगदान नाकारून चालणार नाही.