Pele: फुटबॉल जगतातून काळजी वाढवणारी बातमी. ब्राझीलचे दिग्गज फूटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त ब्राझीलच्या माध्यमांनी दिले आहे. (Pele in Hospital ) पेले यांची प्रकृती अतिशय नाजूक असून त्यांना साओ पाऊलोमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅन्सरशी झुंज देणा-या पेलेंवर  केमोथेरपीचा कोणताही परिणाम होत नसल्यानं ती बंद करण्यात आलीय. शरीरातील अनेक अवयवांनी काम करणं बंद केल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे जगभरातल्या फॅन्सकडून पेलेंसाठी प्रार्थना केल्या जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेले 3 फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे प्रतिनिधी राहिले आहेत. अशी कामगिरी करणारे ते जगातील एकमेव फूटबॉलपटू आहेत. पेले यांच्या नावावर तब्बल 1281 गोल करण्याचा विक्रम आहे. आपल्या कारकीर्दीत संपूर्ण फुटबॉल विश्वावर त्यांनी अधिराज्य गाजवलं होतं. कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक-2022 च्या दरम्यान, पेले यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्याने फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या ब्राझीलच्या महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या पेलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही. एवढेच नाही तर त्यांना अखेरच्या रुग्णालयात हलवावे लागले. ते अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते आणि आता त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे.


पेले यांच्यासाठी प्रार्थना


पेले यांची प्रकृती खालावली आहे. केमोथेरपीचा आता त्याच्यावर परिणाम होत नसल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 82 वर्षीय पेले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे. फ्रेंच दिग्गज किलियन एम्बाप्पेसह फुटबॉल जगतातील अनेक सेलिब्रिटींनीही पेलेच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.


मुलीने अपडेट दिले


पेले यांना 'ट्यूमर'च्या उपचारासाठी साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांच्या प्रकृतीबाबत कोणतीही आपत्कालीन स्थिती नसल्याची माहिती त्यांची मुलगी केली नॅसिमेंटो हिने बुधवारी दिली होती. अमेरिकेत राहणारे नॅसिमेंटो यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, पेले यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पेले यांना 30 नोव्हेंबर रोजीच अल्बर्ट आईनस्टाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.