Rishabh Pant Car Accident: टीम इंडियाचा (Team India) स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीला 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात (Car Accident) झाला होता. रात्रीच्या वेळी आईकडे जात असताना रिषभची गाडी आऊट ऑफ कंट्रोल झाली. या अपघातानंतर रिषभ पंतला देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मुंबईत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता रिषभची प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) असून त्यामध्ये सुधारणा होत आहे.(how did cricketer rishabh pant luxury mercedes car catch fire germany experts reveal secrets marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतर रिषभने ट्विट (Rishabh Pant First Reaction) करत सर्वांचे आभार मानले. या दुखापतीमधून बरा होण्याच्या मार्गावर मी परतलो आहे. यापुढेही माझ्यासमोर आव्हानं असतील आणि त्यांचा सामना करण्यासाठी मी सज्ज आहे, असं रिषभ म्हणाला. रिषभ आता पुन्हा रिकव्हर होत असताना चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता रिषभ पंतच्या लक्झरी कारला (luxury mercedes car) आग लागली तरी कशी?, याबाबत मोठा खुलासा करणार आहेत.


आलिशान मर्सिडीज कारला लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेण्यासाठी जर्मनीतील कंपनीचे (germany experts) तज्ज्ञ 19 जानेवारीला हरिद्वारला येणार आहेत. मर्सिडीज कंपनीच्या तज्ज्ञाच्या तपास अहवालातच गाडीला आगीचं कारण स्पष्ट होऊ शकते, त्यासाठी हरिद्वार पोलीसदेखील वाट पाहत आहेत. त्यामुळे आता सर्वांना प्रतिक्षा लागली आहे.


आणखी वाचा - Sunil Gavaskar: विराट आणि रोहितचं टी-ट्वेंटी करियर संपलंय का? सुनिल गावस्कर स्पष्टच म्हणाले...


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रिषभ फॉर्ममध्ये नव्हता. पंतची श्रीलंकेविरुद्धच्या (IND vs SL) मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नव्हती. त्यानंतर त्याचा अपघात झाला. त्यामुळे आता तो आगामी आयपीएलमध्ये (IPL) खेळणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. तसेच रिषभ मैदानात कधी परतणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.