IND vs AFG: पहिल्या टी-20 साठी कशी असेल भारताची प्लेईंग 11? रोहित `या` खेळाडूचा कापणार पत्ता
IND vs AFG, 1st T20: अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीचं ( Virat Kohli ) कमबॅक झालं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ( IND vs AFG ) तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांना अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे.
IND vs AFG, 1st T20: गुरुवारपासून भारत विरूद्ध अफगाणिस्तान ( IND vs AFG ) यांच्यात टी-20 सिरीज होणार आहे. 3 सामन्यांची ही सिरीज असून टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही सिरीज महत्त्वाची मानली जातेय. पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीने पाहता कर्णधार रोहित शर्माला प्लेईंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देतो हे पहावं लागणार आहे.
अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीचं ( Virat Kohli ) कमबॅक झालं आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ( IND vs AFG ) तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांना अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या ( IND vs AFG ) पहिल्या T20 सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते यावर नजर टाकूया.
कशी असेल ओपनिंग जोडी?
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल कर्णधार रोहित शर्मासह ( Rohit Sharma ) ओपनिंग करण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि यशस्वी जयस्वाल पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ करू शकतात. सुरवातीच्या ओव्हर्समध्ये मोठा स्कोर उभा करण्याची दोघांकडे क्षमता आहे. अशा स्थितीत शुभमन गिलला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मिडल ऑर्डरमध्ये कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली उतरणार आहे. यानंतर तिलक वर्माला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. यानंतर विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनच्या नावाचा पाचव्या क्रमांकावर विचार केला जाऊ शकतो. फिनिशर रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर फलंदाजी उतरणार आहे.
ऑलराऊंडर्स आणि गोलंदाजी डिपार्टमेंट
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात ऑलराऊंडर अक्षर पटेलला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाईल. तर गोलंदाजीमध्ये चायनामॅन स्पिनर कुलदीप यादव टीममध्ये असणार आहे. याशिवाय आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंह यांची टीममध्ये वर्णी लागू शकते.
अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंह.