मुंबई: जगभरात कोरोनाचा विखळा वाढत असताना आता भारतातही IPL आणि क्रिकेट विश्वात कोरोना घुसला आहे. त्यामुळे IPLमधील तीन खेळाडूंनी माघार घेतली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघातील आर अश्विननं देखील कोरोनामुळे IPLमधून ब्रेक घेतला आहे. IPLमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पुन्हा आपल्या घरी कसे जाणार यावरून गेले तीन चार दिवस अनेक घडामोडी समोर येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं अद्यापही मौन बाळगलं आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी तुमची तुम्ही सोय करा असं सांगितलं आहे. BCCIने या खेळाडूंना आधार देत आम्ही व्यवस्था करू असंही म्हटलं आहे. भारतातील सध्याची कोरोनाची स्थिती भयावह आहे. IPLसाठी खेळाडू अत्यंत कडक बायो बबलमध्ये राहात आहेत. तर ऑस्ट्रेलियासाठी जाणारी विमानसेवा देखील रद्द करण्यात आली आहे. 


या सर्व पार्श्वभूमीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडू ग्लॅन मॅक्सवेलनं एक पर्याय सुचवला आहे. भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. त्या संघासोबत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू इंग्लंडला जाऊ शकतात. त्यानंतर इंग्लंडमधून ऑस्ट्रेलियाला कसं जाता येईल याबाबत विचार कराता येईल असंही मॅक्सवेसनं म्हटलं आहे. 


30 मे रोजी IPLमधील शेवटचा सामना होणार आहे. त्यामुळे आता IPLमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची वेगळी व्यवस्था BCCI करणार की मॅक्सवेलनं सुचवलेल्या पर्यायाचा विचार करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.