IPL 2023 Mumbai Indiance : गेल्या दोन दिवसांमागे आयपीएलमधील सर्व संघांनी बीसीसीआयकडे रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवली होती. आयपीएलमधील सर्वाधिक ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने गेमचेंजर पोलार्डला रिलीज केलं होतं. मात्र त्यानेही त्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. अशातच मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी चांगला ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये मुंबईने तिलक वर्मा याला संघात रिटेन केलं होतं. याच तिलक वर्माने मोठी खेळी करत आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये थरारक सामने पाहायला मिळत आहेत.  हैदराबादसाठी तिलक वर्माने केवळ 77 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकारांसह 126 धावा काढल्या.  


मणिपूरने हैदराबादला जिंकण्यासाठी 192 धावांचे लक्ष्य दिलं होते, जे हैदराबादने 3 गडी गमावून पूर्ण केलं तिलकने झंझावाती शतक झळकावत सर्वांची मने जिंकली आणि आयपीएलसाठी तो पूर्णपणे तयार असल्याचं दाखवून दिलं आहे. आयपीएल 2022 मध्ये तिलक वर्माने अप्रतिम खेळ दाखवला होता. गेल्या मोसमात त्याने 14 सामन्यात 36.0 च्या सरासरीने 397 धावा केल्या आहेत. त्यात 2 अर्धशतकांचाही समावेश आहे. 


दरम्यान, मागील मोसमामध्ये मुंबईकडून तिलक वर्माने आक्रमक फलंदाजी करत त्याची ओळख करून दिली होती. रोहित शर्मा, पोलार्डसारखे दिग्गज मागील सीझनमध्ये फ्लॉप गेले होते. मात्र या नव्या दमाच्या पोराने सर्वांनाच धक्का देत मुंबईच्या बॅटींगची भिस्त अनपेक्षितपणे सांभाळली होती.