Indian Cricket Team : टीम इंडियाचा युवा फलंदाज हनुमा विहारी (hanuma vihari) गेल्या दोन वर्षापासून संघाचा भाग नाही. विहारीने शेवटचा कसोटी सामना 2022 मध्ये एजबॅस्टन येथे खेळला होता. या सामन्यात त्याने 22 आणि 11 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला संघात (Team India) स्थान मिळालं नाही. आता तो आपला खेळ सुधारण्यावर आणि टीममध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. रणजीमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने पुन्हा सर्वांना धक्का दिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना हनुमा विहारीने मनातलं दु:ख बोलून दाखवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला हनुमा विहारी?


मी टीम इंडियाच्या कसोटी संघाचा भाग नसल्यामुळे मी दु:खी आणि निराश आहे, परंतु सर्वांनाच क्रिकेटच्या करियरमध्ये चढ-उतारांचा सामना करावा लागतो. माझं काम आता रणजी ट्रॉफीमध्ये धावा करणं आहे. भरपूर धावा करून कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न माझा आहे, असं हनुमा विहारीने म्हटलं आहे. मी माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर आहे जिथे माझ्याकडून कोणतीही अपेक्षा नाही. जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा मी माझे सर्वोत्तम देतो आणि मग जे होईल ते होईल, असंही हनुमाने म्हटलंय.


माझं कोणत्याही खेळाडूशी बोलणं वेगैरे झालं नाही. मी शेवटचं टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांच्याशी बोललो होतो. त्यांनी मला काही चांगल्या सुचना केल्या. मी काय करू शकतो आणि आणखी काय केलं पाहिजे? यावर त्यांनी मला सांगितलंय. मात्र, त्या व्यतिरिक्त आणखी कोणीही काहीही बोललं नाही, असं हनुमा विहारीने म्हटलं आहे.


दरम्यान, इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या अखेरच्या तीन टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली नाही. श्रेयस अय्यर आणि केएस भरत यांच्या फ्लॉप कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये कोणाची निवड होणार? असा सवाल विचारला जात आहे. हनुमा विहारीला पुन्हा संधी मिळणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.


आणखी वाचा - IPL 2024 : 'मी गॅरेंटी देऊन सांगतो...', ऋषभ पंत यंदाची आयपीएल खेळणार की नाही? रिकी पाँटिंग म्हणतो...


भारत विरूद्ध इंग्लंड ( India vs England Test Series )  या सिरीजमध्ये ( India vs England Test Series ) पहिल्या सामन्यात इंग्लंडचा विजय झाला तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) 106 रन्सने इंग्लंडचा पराभव केला. दरम्यान तिसरा टेस्ट सामन्या 15 फेब्रुवारी रोजी रंगणार असून टीम इंडियामध्ये काही प्रमाणात कमतरता असल्याचं अजूनही दिसून येतंय.