मुंबई: आयसीसी नाही तर खराखुरा मीच क्रिकेटमधील बॉस असल्याचं क्रिकेटपटूनं म्हटलं. या स्फोटक फलंदाजाच्या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. वेस्टइंडीजचा धुरंधर फलंदाज ख्रिस गेलनं हे विधान केलं आणि वाद निर्माण झाला. आयसीसी नाही तर तो स्वत: बॉस असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्याच्या मुलाखतीमधील त्याच्या या वाक्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस गेलला स्वत: ला 'युनिव्हर्स बॉस' असं म्हणणं आवडतं. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी -20 मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात ख्रिस गेलने 38 चेंडूत 67 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 7 षटकार ठोकले होते. गेल्या काही सामन्यात गेल फेल गेला होता. त्यानंतर त्याने 50 धावा केल्यानंतर आनंद साजरा केला.



जेव्हा ख्रिस गेलने आपले वादळ अर्धशतक साजरे केले तेव्हा त्याच्या बॅटवरील स्टिकरमध्ये युनिव्हर्स हा शब्द नव्हता. याबद्दल गेलला विचारले असता तो म्हणाला, 'आयसीसीला त्यांच्या फलंदाजाच्या मागील बाजूस युनिव्हर्स बॉस हा शब्द वापरावा असे आयसीसीला वाटत नाही. आयसीसीला मी द युनिव्हर्स बॉस लिहावं असं वाटत नाही. त्यामुळे मी द बॉस असं लिहिलं आहे. मी तर बॉस आहे म्हणून हा स्टिकर लावला आहे.


ICCचा युनिव्हर्स बॉसवर कॉपीराइट आहे. त्यावर गेलनं आणखी मजेशीर उत्तर दिलं. हा मला माहीत आबे मला यावर कॉपीराइट करायला लागेल. क्रिकेटच्या बॉसवर बोलताना ख्रिस गेल म्हणाला की आयसीसी क्रिकेटचा बॉस नाही तर तांत्रिकदृष्ट्या मी बॉस आहे. गेलनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 67 धावा केल्या आहेत. त्या या विधानानंतर सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.