मुंबई : संपूर्ण देशाला गेली अनेक दशकं आपल्या संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangehskar) अनंतात विलीन झाल्या आहेत. लता दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीदींच्या जाण्याने सुवर्ण काळाचा अंत झाला. दीदींच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) दीदींबाबत ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.  (i consider myself fortunate to have been a part of lata mangeshkar life sachin tendulkar emotional tweet) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सचिन काय म्हणाला? 


"मी लता दीदींच्या जीवनातील एक भाग होतो, त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. दीदींनी मला नेहमीच प्रेम केलं आणि आशिर्वाद दिला. दीदींच्या जाण्याने मी माझा एक भाग गमावलंय असं वाटतंय. दीदी नेहमीच संगीताच्या माध्यमातून आमच्यात मनात कायम राहतील", अशा शब्दात सचिनने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 



दरम्यान दीदी आणि सचिन यांच्या दोघांमध्ये असलेलं आई-मुलाचं नातं हे सर्वश्रुत होतं. मी अनेकदा गाण्याचं रेकॉर्डिंग बाजूला ठेवून सचिनचे सामने पाहायचे, अशी प्रतिक्रिया दीदींनी काही वर्षांपूर्वी दिली होती. 


"सचिनने माझी माध्यमांसमोर पहिल्यांदा आई अशी ओळख करुन दिली होती. मी माझ्या आईबाबत काय बोलू शकतो, असं सचिन म्हणाला होता", असा किस्सा लता दीदींनी एका विशेष कार्यक्रमात सांगितला होता. यावरुन या दोघांमध्ये असलेलं आई-मुलाच नातं हे अधोरिखेत होतं.