David Warner Announcement : सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-ट्वेंटी सामन्याची मालिका (WI vs AUS) खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात नवा किर्तीमान रचला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner World Record) मैदानात उतरताच त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नावावर झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 सामने खेळणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. वॉर्नरच्या या कामगिरीचं सध्या जोरदार कौतूक होत असतानाच त्याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात डेव्हिड वॉर्नरने केवळ 36 चेंडूत 70 धावा केल्या. अशातच त्याने आणखी एक विक्रम नावावर केला आहे. आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजेच 100 वी कसोटी, 100 वी वनडे आणि 100 वी टी-20 सामन्यात 50+ धावा करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मात्र, ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर त्याने अनेकांच्या धक्का दिला आहे. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याचं डेव्हिड वॉर्नरने सांगितलं.


काय म्हणाला डेव्हिड वॉर्नर?


आजची खेळपट्टी फलंदाजीसाठी एक छान होती आणि तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा घेता येयला पाहिजे. आज खूप छान आणि ताजेतवाने वाटत आहे, मला आनंद झाला आहे. मला टी-20 विश्वचषक खेळायचा आहे आणि तिथंच करियर संपवायचं आहे. पुढच्या 6 महिन्यांसाठी आम्ही एक चांगला प्रवास करणार आहोत. जवळपास हाच संघ न्यूझीलंडला जाणार आहे, त्यामुळे आम्ही इथंही जिंकणं महत्त्वाचं आहे, असं डेव्हिड वॉर्नर याने म्हटलं आहे.



ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेविड वॉर्नर, जोश इंग्लिस, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), शॉन एबॉट, एडम झम्पा, जेसन बेहरेनडॉर्फ, जोश हेझलवूड.


वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शेरफेन रदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), आंद्रे रसेल, जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ.