मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला रन आऊट केल्यानंतर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उठली होती. त्यावेळी मलाही रवींद्र जडेजाचा राग आला होता. हा राग फक्त तीन मिनीटांपुरताच होता, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्यानं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या ३३९ रन्सचा पाठलाग करताना भारताची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. १७ ओव्हरनंतर भारताची परिस्थिती ७२/६ अशी झाली होती. पण हार्दिक पांड्यानं तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली होती आणि मॅचमध्ये कमबॅक करण्याच्या भारताच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या होत्या. पण ४६ बॉलमध्ये ७६ रन्सवर खेळत असतानाच जडेजाच्या चुकीमुळे पांड्याला रन आऊट व्हावं लागलं.


लगेच भडकण्याची माझी सवय आहे पण मी शांतही लगेच होतो. या रन आऊटनंतर मलाही राग आला होता. पण ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर माझा राग शांत झाला आणि मी हसत होतो, असं पांड्या म्हणाला आहे. जडेजानं हे मुद्दाम केलं नाही. हा खेळाचा भाग आहे, हे सांगायलाही पांड्या विसरला नाही.