T20 World Cup 2024 : आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाला तातडीने वर्ल्डकप खेळायचा आहे. 2 जूनपासू आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी सामना होणार आहे. यावेळी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून आज कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर अजित आगरकर यांची पत्रकार परिषद झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला कर्णधारापदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रोहित शर्मा म्हणाला की, मी कर्णधार होतो, मग मी कर्णधार नव्हता आणि आता पुन्हा कर्णधार आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या पक्षात जाणार नाही आणि आयुष्य असंच आहे. मात्र भारताचं कर्णधारपद भूषवणं माझ्यासाठी चांगला अनुभव होता. मी यापूर्वी अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. त्यामुळे हे माझ्यासाठी काही नवीन नाही. जे जसं आहे, त्यामध्ये मी खूश आहे. एक खेळाडू म्हणून तुम्ही खूप चांगले प्रयत्न कराल. मी गेल्या महिन्यापासून हेच करतोय. 


यावेळी सिलेक्टर अजित आगरकरने म्हटलंय की, हार्दिकने काही टी-20 सिरीजमध्ये भारताचं नेतृत्व केलं असेल, पण रोहित हा एक उत्तम कर्णधार आहे. वनडे वर्ल्डकपनंतर आम्ही सहा महिन्यांचा कालावधी आहे. हार्दिकने मधल्या फळीतही चांगली कामगिरी केली आहे. शिवाय रोहितने वनडे वर्ल्डकपमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. 


रोहित शर्मा पुढे म्हणाला की, टी-20 वर्ल्डकपसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. वेस्ट इंडिजची खेळपट्टी आणि परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही टीम कशी असेल हे ठरवण्यात येणार आहे. ज्या फॉरमॅटचा वर्ल्डकप आहे आम्ही त्यानुसार लक्ष देतोय. 2022 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर अनेक खेळाडूंना या फॉरमॅटमधून ब्रेक देण्यात आला होता. वनडे हा वर्ल्डकप असल्याने आम्ही च्या सामन्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि टी-20 सामने खेळलो नाही. आम्ही टेस्टला प्राधान्य दिलं कारण कोणीही हा फॉरमॅट चुकवू इच्छित नाही. 


टी-20 वर्ल्डकपसाठी कशी आहे टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज.


रिझर्व खेळाडू - शुभमन गिल, खलिल अहमद, आवेश खान, रिंकू सिंग.